Ad will apear here
Next
वैयक्तिक बचतीच्या नियमांमध्ये बदल लागू

पुणे : केंद्र सरकारने वैयक्तिक बचतीच्या (पर्सनल फायनान्स) संदर्भातील काही नियमांमध्ये बदल केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे. हे बदल बारकाईने जाणून घेणे आवश्यक आहे. 

पाच लाखांपर्यंतचे करपात्र उत्पन्न करमुक्त 
केंद्र सरकारने एक फेब्रुवारी २०१९ रोजी सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पात वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे करपात्र उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संबंधितांचे उत्पन्न या कक्षेत मोडते, त्यांना कोणत्याही प्रकारचा प्राप्तिकर देण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच प्रमाणित वजावटीची (स्टँडर्ड डिडक्शन) मर्यादा केंद्र सरकारने पू्र्वीच्या ४०हजारांवरून ५० हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. 

टीडीएसची मर्यादा चाळीस हजारांपर्यंत 
व्याजापोटी मिळणाऱ्या उत्पन्नावरील करकपातीची मर्यादा (टीडीएस) वार्षिक १० हजार रुपयांवरून ४० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. याचा फायदा सामान्य तसेच बड्या गुंतवणूकदारांना मिळणार आहे. ज्यांना बँकेत अथवा पोस्टामध्ये ठेवलेल्या मुदत ठेवींवर व्याज प्राप्त होते. आजवर ठेवीदारांना वार्षिक दहा हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर भरावा लागत होता. 

दुसऱ्या घराचे उत्पन्नही करमुक्त 
हंगामी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे करदात्याकडे दोन घरे असतील, तर दुसरे घरही आता ‘सेल्फ ऑक्युपाइड’ मानून, त्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही. या आधी एकापेक्षा अधिक घरे असल्यास एकच घर ‘सेल्फ ऑक्युपाइड’ मानले जाते आणि दुसरे घर भाड्याने दिले असल्यास त्यावरील उत्पन्न करपात्र मानले जात होते. 


घरांसाठी 'जीएसटी'च्या दरांत बदल 
नवीन आर्थिक वर्षात जीएसटी परिषदेने २४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीत जारी केलेले नवीन दर लागू होणार आहेत. विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांना जीएसटीचे दोन पर्याय उपलब्ध असतील. तसेच घरखरेदी करताना घराचे बांधकाम अपूर्ण असेल, काम सुरू असेल तर १२ टक्क्यांऐवजी पाच टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे किंमती कमी होण्याची शक्यता आहे. 

प्राप्तीकर खात्याचे सोशल मीडियावरही लक्ष 
कर चुकवणाऱ्या नागरिकांना करकक्षेत आणण्यासाठी ‘प्रोजेक्ट इन साईट’ या योजनेअंतर्गत प्राप्तीकर खाते सोशल मीडियाचा वापर करणार आहे. याअंतर्गत करपात्र आणि कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांचे ‘प्रोफाइल’ तयार करण्यात येणार असून, सोशल मीडिया खात्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

कागदी समभागांचा वापर बंद 
ज्या गुंतवणूकदारांकडे अद्याप नोंदणीकृत कंपन्यांचे कागदी (फिजिकल) समभाग असतील तर त्यांनी ते ‘डीमॅट’ करणे आवश्यक आहे. एक एप्रिलनंतर असे समभाग विकता अथवा हस्तांतरीत करता येणार नाहीत. जूनमध्ये ‘सेबी’ने नियमांमध्ये बदल केला आहे. 

आयुर्विमा होणार स्वस्त
विमा कंपन्यांना ‘जीएसटी’च्या नव्या नियमांचे पालन करावे लागणार असल्याने आयुर्विमा स्वस्त होणार आहे. विमा कंपन्या आतापर्यंत २००६-०८ चा डेटा आधार म्हणून वापरत होत्या;मात्र एक एप्रिलपासून विमा कंपन्यांना २०१२-१४ मध्ये तयार करण्यात आलेल्या नव्या ‘डेटा’चा आधार घ्यावा लागणार आहे. त्याचा फायदा २२ ते ५० वर्षे वयोगटाला होणार आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZZCBZ
Similar Posts
‘जीएसटी’चा ताळमेळ सोप्या पायऱ्यांमध्ये वस्तू आणि सेवा कराखालील (जीएसटी) ताळमेळ म्हणजे दुसरे काही नाही, तर पुरवठादाराने सादर केलेला डेटा त्याच्या पावत्यांसोबत जुळवणे आणि त्या विशिष्ट कालावधीत झालेल्या सर्व व्यवहारांची नोंद करणे. जीएसटी विवरणपत्रात विक्री किंवा खरेदीचा कोणताही व्यवहार गाळला जाणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीने सादर होणार नाही हे ताळमेळ जुळवण्याची प्रक्रिया निश्चित करते
प्राप्तिकर विवरणपत्रावर जीएसटीचा प्रभाव प्राप्तिकर विवरणपत्रात जीएसटीचे तपशील देणे आता प्रत्येक व्यवसायासाठी आणि पेशासाठी अत्यावश्यक झाले आहे. व्यवसायांचे मालक किंवा व्यक्तिगत स्तरावरील व्यावसायिकांमध्ये याची पूर्तता करण्याचे प्रमाण तुलनेने कमी असले, तरी कंपन्यांना त्यांच्या खर्चाची फोड करण्याचे निर्देश आहेत. आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये जीएसटीखाली
टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे ‘जीएसटी’ अभ्यासक्रम पुणे : ‘दि वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे (डब्ल्यूएमटीपीए) वस्तू व सेवा कर (जीएसटी) या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. हा अभ्यासक्रम दोन महिन्यांचा असून, त्याची सुरुवात आठ डिसेंबर २०१८ पासून होत आहे’, अशी माहिती असोसिएशनचे मुख्य संयोजक व माजी अध्यक्ष नरेंद्र सोनावणे,
‘शास्त्रीय संगीत कार्यक्रमांवरील जीएसटी रद्द करा’ पुणे : ‘केंद्र सरकारने भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर लावलेल्या २८ टक्के जीएसटीमुळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांच्या किंमती वाढत असून त्यामुळे श्रोत्यांची संख्या रोडावेल आणि याचा शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारावर नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे या कार्यक्रमांवरील जीएसटी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language